Posts

Showing posts from July, 2022

जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला

 अभंग जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला ।।धृ ।। सुखदुःखाच्या पलिकडला, आहे असा हा मुक्काम । नाही स्वर्ग की नरक ही,हे तर आहे मुक्तीधाम ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून, घेऊ जाणून देवाची लीला ।।१।। संसारातील सुखदुःखांना,घरीच सोडून या । भक्ती निरपेक्ष असावी,हे तुम्ही जाणून घ्या ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,कर्म देईल फळ तुम्हाला ।।२।। कर्तव्य पूर्ती होता,तुम्ही घेतली समाधी । कर्म हाच धर्म आहे,भक्ती नाही आहे ही साधी ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,भिऊ नका तुम्ही मरणाला ।।३।। सुहास सदाशिव सांबरे दि.१४/७/२००५