गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे
शबरीने जेव्हा रामासमोर खाण्यासाठी बोरे ठेवली तेव्हा अरे हाड,असली उष्टी बोरे आम्ही खात नसतो असे न म्हणता रामाने ती उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. ते पाहून शबरीला अपार आनंद झाला,आपले जीवन धन्य झाले असे वाटले. त्याच क्षणी एक सर्वसामान्य मानव असलेला राम भगवान श्रीराम झाले. कारण त्यांनी ती बोरं उष्टी आहेत हे पाहिले नाही तर त्यामागे शबरीची भक्ती,श्रद्धा कष्ट पाहिले. लेखक - सुहास सांबरे