प्रभु श्रीरामाची कृतज्ञता बुद्धी
आज २२ जानेवारी २०२४, रामजन्मभूमी वर आज रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.पाचशे वर्षांचा दीर्घ आणि प्रचंड संघर्ष केल्यावर आज हा अलौकिक दिवस उगवला आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्याला हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य लाभले आहे.गेल्या पाचशे वर्षात असंख्य राम भक्तांनी यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे,त्या सर्वांचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.श्रीरामाचे आयुष्य म्हणजे आदर्श गुणांनी भरलेले आयुष्य,आणि अशा असंख्य गुणांपैकी एक महत्वाचा गुण म्हणजे आपण आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे . प्रभू श्रीराम यांच्या याच गुणाविषयी मला या लेखात काही सांगायचे आहे. रामायणात असे अनेक प्रसंग असे आहेत ज्यातून आपल्याला रामाचा हा सद्गुण दिसून येतो . सेतू बांधत असताना अनेक शक्तिशाली वानर मोठमोठ्या शिळा उचलून आणत होते आणि त्या सेतूच्या बांधकामात वापरल्या जात होत्या.त्याचवेळी रामाला तिथे एक खार काहीतरी धावपळ करताना दिसली.ती खार मातीत जाऊन लोळत होती आणि नंतर त्या सेतुवर जाऊन अंग झटकत होती.रामाने तिला विचारले की हे तू काय करत आहेस.त्यावर ती म्हणाली...