आईची आठवण
तुझी आठवण जातच नाही आई मनातून माझ्या | किती तरी गोड त्या स्मृति, तुझ्या संगती, सदा राहतील ताज्या || घर भरलेले, मन भरलेले, आनंदाने गजबजलेले, तू होतीस जेव्हा आई । आनंदाचे, अन दुःखाचे , सगळच बोलत होतो तु होतीस जेव्हा आई । आता कुणाशीच नाही बोलणे, सारी कोंडले मी,हृदयात माझ्या || ते घर आता, उरले केवळ ,चार भिंती छपराचे असणे ते गावही आता, वाटे परके, जिथे नाही तुझे बोलणे चालणे । जिथे त्रस्त मनाला, मिळेल विसावा ,अशी उरलीच नाही या जगी कुठलीच जागा|| सुहास सदाशिव सांबरे 30.09.2020