बायोपिक सिनेमे आणि बॉक्स ऑफिस व्यवसाय
बायोपिक आणि बॉक्स ऑफिस सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रपट म्हणजे बायोपिकची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि त्याच बरोबर या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद आहे यावर पण समर्थक आणि विरोधक दोघेही लक्ष ठेवून आहेत. आता मुख्य धारेत येणारे हिंदीतले मसाला चित्रपट आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या वर येणारे चरित्रपट यांच्या होणाऱ्या व्यवसायाची तुलना करणे योग्य होणार नाही.म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चरित्र पटांचे बजेट आणि त्यांनी केलेला व्यवसाय याची तुलना किंवा अभ्यास करू. 1. महात्मा फुले यांच्या वर नुकताच जानेवारीत सत्यशोधक हा सिनेमा येऊन गेला.या सिनेमाचं बजेट होतं 4 कोटी आणि व्यवसाय झाला फक्त 2.6 कोटी.म्हणजे बजेट सुध्दा रिकव्हर झालं नाही. 2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर काही वर्षापूर्वी Bose The forgotten Hero हा सिनेमा येऊन गेला. त्याचं बजेट होतं 4 कोटी आणि एकूण व्यवसाय झाला 1.85 कोटी. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल हे आहे आपलं प्रेम आणि आदर. 3. भगतसिंह यांच्यावर एकाच वर्षी एकदम तीन चार सिनेमे आले त्यापैकी अजय देवगणचा थोडाफार चालला. बजेट होतं 20 क...