स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमा

 काल 25 मार्च रोजी डेक्कन आर मल्टिप्लेक्स मध्ये हाऊसफुल्ल गर्दीत रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्य वीर सावरकर हा सिनेमा पाहिला, त्याबद्दल माझे दोन शब्द.


रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?

-- कवी गोविंद


सिनेमा सुरू होतो,सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. जिथे स्वातंत्र्याचा विषय ,तिथे शिवाजी महाराजांची प्रेरणा तर असणारच.

चित्रपटाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असले तरी देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या पण खूप लोकांना माहीत सुध्दा नसलेल्या अनेक क्रांतिकारकांची माहिती हा चित्रपट आपल्याला देतो. चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके,बाबाराव सावरकर, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट, मॅडम भिकाजी कामा, नानी गोपाल, अनंता कान्हेरे या सर्वाचे योगदान आणि बलिदान माहीत होते. लोकमान्य टिळक,भगतसिंग राजगुरू सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान नेते तर आपल्याला माहीतच असतात.गांधीजींचे सुध्दा योगदान आहेच.ज्यांना गांधीजींचे संरक्षण करता आले नाही ते पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या संरक्षणासाठी मात्र देशासाठी घरदार उद्ध्वस्त करून घेतलेल्या सावरकरांना स्वतंत्र भारतात तुरुंगात टाकतात हे पाहून संताप अनावर होतो. शेवटी आझाद हिंद सेना आणि नौदलाच्या उठावामुळे ब्रिटिश देश सोडून जायचा निर्णय घेतात आणि भारत स्वतंत्र होतो .

सिनेमा पाहताना अनेक ठिकाणी आपोआप टाळ्या वाजवल्या जातात तर अनेक वेळा भारत माता की जय आणि वंदे मातरम् अशा घोषणा लोक देतात. थिएटर मध्ये अंगावर रोमांच निर्माण करणारे वातावरण तयार होते.

देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहावा अशी विनंती करतो.

रणदीप हुड्डा ह्यांच्या अभिनयाचे,दिग्दर्शनाचे कौतुक तर सगळीकडे होतच आहे,पण मला सर्वात जास्त कौतुक याचे वाटते की एक अमराठी कलाकाराने मोठी आर्थिक रिस्क घेऊन स्वतः पैसे गुंतवून हा सिनेमा बनवला आहे .सिनेमा बनवणे ही इतकी मोठी रिस्क असते की राज कपूर सारखे यशस्वी कलाकार ज्यांना शोमन म्हटले जाते,ते सुध्दा मेरा नाम जोकर सिनेमा बनवला तेव्हा पिक्चर  आपटल्याने साफ बुडाले होते .तेव्हा भविष्यात खऱ्या क्रांतिकारकांचे जीवन दाखवणारे असेच दर्जेदार पिक्चर बघायचे असतील तर हा पिक्चर सुपरहिट बनवणे आपल्या सर्व राष्ट्रप्रेमी जनतेचे कर्तव्य आहे .


टीप - आपल्या आयुष्यात जर कुणी दुःख,निराशा , अपयश यांनी ग्रासलेले असेल तर त्यांनी हा सिनेमा नक्कीच पहावा,त्यांना आयुष्यात दुःख आणि संकटाना सामोरे जाण्यासाठी जबरदस्त प्रेरणा त्यातून मिळेल.

Comments

Popular posts from this blog

खरा मित्र ज्ञानदेव

कविता - मला माणूस पाहिजे

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे