बायोपिक सिनेमे आणि बॉक्स ऑफिस व्यवसाय

 बायोपिक आणि बॉक्स ऑफिस


सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रपट म्हणजे बायोपिकची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि त्याच बरोबर या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद आहे यावर पण समर्थक आणि विरोधक दोघेही लक्ष ठेवून आहेत.

आता मुख्य धारेत येणारे हिंदीतले मसाला चित्रपट आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या वर येणारे चरित्रपट यांच्या होणाऱ्या व्यवसायाची तुलना करणे योग्य होणार नाही.म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चरित्र पटांचे बजेट आणि त्यांनी केलेला व्यवसाय याची तुलना किंवा अभ्यास करू.

1. महात्मा फुले यांच्या वर नुकताच जानेवारीत सत्यशोधक हा सिनेमा येऊन गेला.या सिनेमाचं बजेट होतं 4 कोटी आणि व्यवसाय झाला फक्त 2.6 कोटी.म्हणजे बजेट सुध्दा रिकव्हर झालं नाही.

2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर काही वर्षापूर्वी Bose The forgotten Hero हा सिनेमा येऊन गेला. त्याचं बजेट होतं 4 कोटी आणि एकूण व्यवसाय झाला 1.85 कोटी. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल हे आहे आपलं प्रेम आणि आदर.

3. भगतसिंह यांच्यावर एकाच वर्षी एकदम तीन चार सिनेमे आले त्यापैकी अजय देवगणचा थोडाफार चालला. बजेट होतं 20 कोटी आणि व्यवसाय फक्त 12.93 कोटी. भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना वाटलं असेल कुठल्या लोकांसाठी आपण फासावर गेलो ? 

4. परेश रावल यांनी भूमिका केलेला सरदार पटेल या सिनेमाची व्यवसाय फक्त 1.25 कोटी दिसत आहे,जास्त माहिती उपलब्ध नाही.

5. आणि आता विषय सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्य वीर सावरकर या सिनेमाचा. बजेट आहे वीस कोटी आणि पाच दिवसात 13 कोटीचा व्यवसाय झाला आहे.वर दिलेल्या चित्रपटांचे आकडे पाहता हे आकडे उत्साहवर्धक आहेत.रणदीप हुड्डा या मराठी नसलेल्या माणसाला सावरकरांच्या चरित्राने झपाटून टाकलं आणि त्यांनी मोठी आर्थिक रिस्क घेऊन स्वतः हा चरित्रपट बनवला आहे. आर्थिक रिस्क अशासाठी म्हणतोय की वरील उदाहरणे बघता बायोपिक सिनेमे मग ते कोणत्याही महापुरुषांचे असोत,ते सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेले आहेत,तरीही रणदीप हुड्डा यांनी ही रिस्क घेतली आणि एक अप्रतिम सिनेमा बनवला आहे.त्यामुळे या सिनेमाचे जे समर्थक असतील त्यांनी हा सिनेमा थियेटर मध्ये जाऊन पाहणे हे कर्तव्य मानले पाहिजे.अभिनय ,पटकथा आणि विषयाची योग्य आणि सत्य मांडणी असा सर्व दृष्टीने अप्रतिम सिनेमा बनला आहे,तिकिटाचे पैसे नक्की वसूल होतील आणि जे विरोधक असतील त्यांनी निदान त्यातील चुका शोधायला का होईना,एकदा हा सिनेमा बघून घ्यावा.आणि द्वेष बुद्धी असणाऱ्यांनी मुळीच जाऊ नये,तुमचे मतपरिवर्तन होण्याचा जाम धोका आहे.

सुहास सदाशिव सांबरे

Comments

Popular posts from this blog

खरा मित्र ज्ञानदेव

कविता - मला माणूस पाहिजे

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे