श्री गणेश
|| श्री गणेश प्रसन्न ||
|| श्री सिद्धिविनायक प्रसन्न ||
जेथे मनाला मिळतो विसावा
असं आहे या जगी एकच गाव
सिद्धटेक वसलेले भिमातीरावर ।। धृ ।।
या जीवनातल्या उन्हात तूच आहे शीतल छाया
तूच आहे दया सागर रे
ज्याचा लागेना कुणाला ठाव ।। १ ।।
माझ्या गळ्यातला सूर देवा तुझीच आहे कृपा
गीत गातो तुझ्या स्तुतीचे
त्यात भोळा आहे भक्तिभाव ।। २।।
सुहास सांबरे
06.05.2021
Comments
Post a Comment