चहाचा पाढा
चहा एके चहा,चहा दुणे साखर
कमी जाते भाकर,या चहाने हो
चहा एके चहा,चहा त्रिक खारी
चव लई न्यारी,या चहाची हो
चहा एक चहा,चहा चोक बशी
उठून बसला आळशी, एक चहाने हो
चहा एक चहा, चहा पंचे टोस्ट
जमा झाले दोस्त,या चहाचे हो
चहा एके चहा,चहा सके कप
दुनिया बसते गप,या चहाने हो
चहा एके चहा,चहा सत्ते पत्ती
गायब झाली सुस्ती,या चहाने हो
चहा एके चहा,चहा आठ्ठे कटिंग
सुरू करा मिटिंग,या चहाने हो
चहा एके चहा,चहा नव्वे गाळण
मिटून गेले भांडण,एका चहाने हो
चहा एके चहा,चहा दहा दूध
पृथ्वीवर अमृत,आहे चहा हो
रचना - सुहास सांबरे
दि.15.12.2021
Comments
Post a Comment