माझं मत अजिबात वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं


मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबांनी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले

तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत वाया नाही गेलं


अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती

तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली 

तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं


गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वाय फाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली

आणि आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला 

तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं


शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे पार्थिव आले की खूप दुःख व्हायचे

अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं


रस्ते चकचकीत झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली,बस प्रवास स्वस्त झाले

दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली

तेव्हा माझ्या ....


माझ्या देशावर जे शत्रू हल्ला करायचे ,आता त्यांना त्यांच्याच देशात जाऊन कुणीतरी अज्ञात ठोकत आहेत हे ऐकलं

तेव्हा ......


शेतकऱ्यांना, गोरगरिबांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात मिळणारी मदत , 80 कोटी गरजूंना मिळणारे अन्नधान्य हे सारे पाहिले

तेव्हा ....


2009 मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांना घाबरून निवडणूक काळात सुरक्षा देऊ शकत नाही म्हणू न ipl द आफ्रिकेत पाठवणारे दुबळे सरकार एकीकडे

आणि सध्या निवडणूक काळात सुद्धा अगदी ipl स्पर्धेचा सहज आनंद घेणारी जनता पाहिली

तेव्हा ....


श्रीलंकेत पेट्रोल भाव 400 रु,पाकिस्तान मध्ये 270 रुपये पाहिले

मग भारतात पेट्रोल भाव 103 रुपये पाहिले 

तेव्हा .....


ते भर उन्हाळ्यात दहा दहा तासाचे लोडशेडिंग,घरगुती गॅस साठी लागणाऱ्या रांगा अजूनही आठवतात

आता ते कुठेच दिसत नाही हे पाहिले

तेव्हा ....


पूर्वी असे म्हणायला आपल्याला गर्व वाटायचा की रशिया भारताचा मित्र आहे, अमेरिका भारताचा मित्र आहे

आणि आता जगातील देशांना गौरवाने म्हणताना पाहिलं की भारत आमचा मित्र देश आहे 

तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया गेलं नाही


राममंदिर होणारच नाही,370 कलम हटविले जाऊच शकत नाही असे या पराभूत मनाला वाटू लागले होत्र

पण पाचशे वर्षांनी,कित्येक पिढ्याच्या लढ्यानंतर आपल्या पिढीला मात्र राममंदिरात रामाचे दर्शन घ्यायचे भाग्य लाभले

तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया नाही गेलं

तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया गेलं नाही


रचना - सुहास सदाशिव सांबरे

1 मे 2024

Comments

Popular posts from this blog

खरा मित्र ज्ञानदेव

कविता - मला माणूस पाहिजे

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे