वाचनाचे वेड
पुस्तकाची गोडी लागू दे मनाला
वाचनाचे वेड लागू दे मनाला !!
वेड वाचनाचे करील शहाणे
ज्ञान हीच शक्ती येते पुस्तकाने
संस्कृतीचा ठेवा वाढत चालला
वाचनाचे वेड लागू दे मनाला || १ ||
धर्म विज्ञान इतिहास भाषा
पुस्तकाने भारले महाराष्ट्र देशा
ज्ञान असे आहे धन,जात नाही चोरीला
वाचनाचे वेड लागू दे मनाला || २ ||
ग्रंथ हेच गुरु जुनी आहे उक्ती
वाया नाही जात पुस्तकाची भक्ती
सुशिक्षित ज्ञानी जनता पुढे नेईल देशाला
वाचनाचे वेड लागू दे मनाला || ३ ||
सुहास सदाशिव सांबरे
दिशा भूमी रेसिडेन्सी, नवले ब्रीज जवळ
आंबेगाव बुद्रुक
पुणे ४११९४६
मो. 8308150800
Comments
Post a Comment