Posts

वाचनाचे वेड

 पुस्तकाची गोडी लागू दे मनाला वाचनाचे वेड लागू दे मनाला !! वेड वाचनाचे करील शहाणे ज्ञान हीच शक्ती येते पुस्तकाने  संस्कृतीचा ठेवा वाढत चालला  वाचनाचे वेड लागू दे मनाला || १ || धर्म विज्ञान इतिहास भाषा पुस्तकाने भारले महाराष्ट्र देशा ज्ञान असे आहे धन,जात नाही चोरीला वाचनाचे वेड लागू दे मनाला || २ || ग्रंथ हेच गुरु जुनी आहे उक्ती वाया नाही जात पुस्तकाची भक्ती सुशिक्षित ज्ञानी जनता पुढे नेईल देशाला वाचनाचे वेड लागू दे मनाला || ३ || सुहास सदाशिव सांबरे दिशा भूमी रेसिडेन्सी, नवले ब्रीज जवळ आंबेगाव बुद्रुक पुणे ४११९४६ मो. 8308150800

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे

 शबरीने जेव्हा रामासमोर खाण्यासाठी बोरे ठेवली तेव्हा अरे हाड,असली उष्टी बोरे आम्ही खात नसतो असे न म्हणता रामाने ती उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. ते पाहून शबरीला अपार आनंद झाला,आपले जीवन धन्य झाले असे वाटले. त्याच क्षणी एक सर्वसामान्य मानव असलेला राम भगवान श्रीराम झाले. कारण त्यांनी ती बोरं उष्टी आहेत हे पाहिले नाही तर त्यामागे शबरीची भक्ती,श्रद्धा  कष्ट पाहिले. लेखक - सुहास सांबरे 

EVM चा गडबड घोटाळा

 जुनी म्हण नाचता येईना अंगण वाकडे नवीन म्हण जिंकता येईना EVM हॅकडे 

मी मात्र अपात्र ठरलो नाही

                 मी मात्र अपात्र ठरलो नाही. सध्या विनेश फोगट यांच्या अपात्र होण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यादा वजन गट मधून कमी वजन गटात भाग घेतला,फायनल मध्ये थोडे वजन जास्त भरले  आणि ऑलिम्पिक समितीने त्यांना अपात्र घोषित केले आणि आपले खात्रीने मिळणारे गोल्ड मेडल गेले असा दुर्दैवी प्रसंग घडला . त्यावरून मला माझी लहानपणी ची एक गंमत आठवली ज्यात मी सुद्धा असा प्रकार केला होता. तेव्हा मी झरेकाठी या गावी इयत्ता चवथी मध्ये शिकत होतो.एकदा माझे वडील मला आमच्या मूळ गावी उंबरीला घेऊन गेले.असंच एकदा दुपारच्या वेळी आमचे आजोबा मला शाळेबद्दल विचारू लागले आणि म्हणाले की झरेकाठी पेक्षा आमच्या उंबरीच्या शाळेतील मुलं जास्त हुशार आहेत.मी मान हलविली आणि गप्प बसलो. मी अजिबात चिडलो नाही हे पाहून आजोबा मला परत म्हणाले की चल तुला इथल्या शाळेत घेऊन जातो,वर्गात गुरुजी तुझी परीक्षा घेतील, मग बघू तू किती हुशार आहे? सांग तू कितवीत आहे म्हणजे आपण त्या वर्गात जाऊ.      माहीत नाही मला अचानक त्या एवढ्या लहान वयात ही आयडिया कशी सुचली,मी एक वर्ग कमी म्हण...

माझं मत वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबानी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वायफाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली तरी आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे शव आले की खूप दुःख व्हायचे. अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,बस प्रवास स्वस्त झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गे...

माझं मत अजिबात वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबांनी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वाय फाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली आणि आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे पार्थिव आले की खूप दुःख व्हायचे अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली,बस प्रवास स्वस्त झाले दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या .... माझ्या देशावर जे शत्रू हल्ला करायच...

बायोपिक सिनेमे आणि बॉक्स ऑफिस व्यवसाय

 बायोपिक आणि बॉक्स ऑफिस सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रपट म्हणजे बायोपिकची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि त्याच बरोबर या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद आहे यावर पण समर्थक आणि विरोधक दोघेही लक्ष ठेवून आहेत. आता मुख्य धारेत येणारे हिंदीतले मसाला चित्रपट आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या वर येणारे चरित्रपट यांच्या होणाऱ्या व्यवसायाची तुलना करणे योग्य होणार नाही.म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चरित्र पटांचे बजेट आणि त्यांनी केलेला व्यवसाय याची तुलना किंवा अभ्यास करू. 1. महात्मा फुले यांच्या वर नुकताच जानेवारीत सत्यशोधक हा सिनेमा येऊन गेला.या सिनेमाचं बजेट होतं 4 कोटी आणि व्यवसाय झाला फक्त 2.6 कोटी.म्हणजे बजेट सुध्दा रिकव्हर झालं नाही. 2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर काही वर्षापूर्वी Bose The forgotten Hero हा सिनेमा येऊन गेला. त्याचं बजेट होतं 4 कोटी आणि एकूण व्यवसाय झाला 1.85 कोटी. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल हे आहे आपलं प्रेम आणि आदर. 3. भगतसिंह यांच्यावर एकाच वर्षी एकदम तीन चार सिनेमे आले त्यापैकी अजय देवगणचा थोडाफार चालला. बजेट होतं 20 क...