Posts

मी मात्र अपात्र ठरलो नाही

                 मी मात्र अपात्र ठरलो नाही. सध्या विनेश फोगट यांच्या अपात्र होण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यादा वजन गट मधून कमी वजन गटात भाग घेतला,फायनल मध्ये थोडे वजन जास्त भरले  आणि ऑलिम्पिक समितीने त्यांना अपात्र घोषित केले आणि आपले खात्रीने मिळणारे गोल्ड मेडल गेले असा दुर्दैवी प्रसंग घडला . त्यावरून मला माझी लहानपणी ची एक गंमत आठवली ज्यात मी सुद्धा असा प्रकार केला होता. तेव्हा मी झरेकाठी या गावी इयत्ता चवथी मध्ये शिकत होतो.एकदा माझे वडील मला आमच्या मूळ गावी उंबरीला घेऊन गेले.असंच एकदा दुपारच्या वेळी आमचे आजोबा मला शाळेबद्दल विचारू लागले आणि म्हणाले की झरेकाठी पेक्षा आमच्या उंबरीच्या शाळेतील मुलं जास्त हुशार आहेत.मी मान हलविली आणि गप्प बसलो. मी अजिबात चिडलो नाही हे पाहून आजोबा मला परत म्हणाले की चल तुला इथल्या शाळेत घेऊन जातो,वर्गात गुरुजी तुझी परीक्षा घेतील, मग बघू तू किती हुशार आहे? सांग तू कितवीत आहे म्हणजे आपण त्या वर्गात जाऊ.      माहीत नाही मला अचानक त्या एवढ्या लहान वयात ही आयडिया कशी सुचली,मी एक वर्ग कमी म्हण...

माझं मत वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबानी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वायफाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली तरी आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे शव आले की खूप दुःख व्हायचे. अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,बस प्रवास स्वस्त झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गे...

माझं मत अजिबात वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबांनी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वाय फाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली आणि आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे पार्थिव आले की खूप दुःख व्हायचे अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली,बस प्रवास स्वस्त झाले दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या .... माझ्या देशावर जे शत्रू हल्ला करायच...

बायोपिक सिनेमे आणि बॉक्स ऑफिस व्यवसाय

 बायोपिक आणि बॉक्स ऑफिस सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रपट म्हणजे बायोपिकची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि त्याच बरोबर या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद आहे यावर पण समर्थक आणि विरोधक दोघेही लक्ष ठेवून आहेत. आता मुख्य धारेत येणारे हिंदीतले मसाला चित्रपट आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या वर येणारे चरित्रपट यांच्या होणाऱ्या व्यवसायाची तुलना करणे योग्य होणार नाही.म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चरित्र पटांचे बजेट आणि त्यांनी केलेला व्यवसाय याची तुलना किंवा अभ्यास करू. 1. महात्मा फुले यांच्या वर नुकताच जानेवारीत सत्यशोधक हा सिनेमा येऊन गेला.या सिनेमाचं बजेट होतं 4 कोटी आणि व्यवसाय झाला फक्त 2.6 कोटी.म्हणजे बजेट सुध्दा रिकव्हर झालं नाही. 2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर काही वर्षापूर्वी Bose The forgotten Hero हा सिनेमा येऊन गेला. त्याचं बजेट होतं 4 कोटी आणि एकूण व्यवसाय झाला 1.85 कोटी. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल हे आहे आपलं प्रेम आणि आदर. 3. भगतसिंह यांच्यावर एकाच वर्षी एकदम तीन चार सिनेमे आले त्यापैकी अजय देवगणचा थोडाफार चालला. बजेट होतं 20 क...

स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमा

 काल 25 मार्च रोजी डेक्कन आर मल्टिप्लेक्स मध्ये हाऊसफुल्ल गर्दीत रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्य वीर सावरकर हा सिनेमा पाहिला, त्याबद्दल माझे दोन शब्द. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? -- कवी गोविंद सिनेमा सुरू होतो,सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. जिथे स्वातंत्र्याचा विषय ,तिथे शिवाजी महाराजांची प्रेरणा तर असणारच. चित्रपटाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असले तरी देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या पण खूप लोकांना माहीत सुध्दा नसलेल्या अनेक क्रांतिकारकांची माहिती हा चित्रपट आपल्याला देतो. चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके,बाबाराव सावरकर, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट, मॅडम भिकाजी कामा, नानी गोपाल, अनंता कान्हेरे या सर्वाचे योगदान आणि बलिदान माहीत होते. लोकमान्य टिळक,भगतसिंग राजगुरू सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान नेते तर आपल्याला माहीतच असतात.गांधीजींचे सुध्दा योगदान आहेच.ज्यांना गांधीजींचे संरक्षण करता आले नाही ते पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या संरक्षणासाठी मात्र देशासाठी घरदार उद्ध्वस्त करून घेतलेल्या सावरकरांना स्वतंत्र भारतात तुरुंगात टाकतात हे पाहून संता...

प्रभु श्रीरामाची कृतज्ञता बुद्धी

  आज २२ जानेवारी २०२४, रामजन्मभूमी वर आज रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.पाचशे वर्षांचा दीर्घ आणि प्रचंड संघर्ष केल्यावर आज हा अलौकिक दिवस उगवला आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्याला हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य लाभले आहे.गेल्या पाचशे वर्षात असंख्य राम भक्तांनी यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे,त्या सर्वांचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.श्रीरामाचे आयुष्य म्हणजे आदर्श गुणांनी भरलेले आयुष्य,आणि अशा असंख्य गुणांपैकी एक महत्वाचा गुण म्हणजे आपण आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे . प्रभू श्रीराम यांच्या याच गुणाविषयी मला या लेखात काही सांगायचे आहे. रामायणात असे अनेक प्रसंग असे आहेत ज्यातून आपल्याला रामाचा हा सद्गुण दिसून येतो . सेतू बांधत असताना अनेक शक्तिशाली वानर मोठमोठ्या शिळा उचलून आणत होते आणि त्या सेतूच्या बांधकामात वापरल्या जात होत्या.त्याचवेळी रामाला तिथे एक खार काहीतरी धावपळ करताना दिसली.ती खार मातीत जाऊन लोळत होती आणि नंतर त्या सेतुवर जाऊन अंग झटकत होती.रामाने तिला विचारले की हे तू काय करत आहेस.त्यावर ती म्हणाली...

जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला

 अभंग जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला ।।धृ ।। सुखदुःखाच्या पलिकडला, आहे असा हा मुक्काम । नाही स्वर्ग की नरक ही,हे तर आहे मुक्तीधाम ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून, घेऊ जाणून देवाची लीला ।।१।। संसारातील सुखदुःखांना,घरीच सोडून या । भक्ती निरपेक्ष असावी,हे तुम्ही जाणून घ्या ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,कर्म देईल फळ तुम्हाला ।।२।। कर्तव्य पूर्ती होता,तुम्ही घेतली समाधी । कर्म हाच धर्म आहे,भक्ती नाही आहे ही साधी ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,भिऊ नका तुम्ही मरणाला ।।३।। सुहास सदाशिव सांबरे दि.१४/७/२००५