Posts

जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला

 अभंग जाऊ आळंदीला,भेटू माऊलीला ।।धृ ।। सुखदुःखाच्या पलिकडला, आहे असा हा मुक्काम । नाही स्वर्ग की नरक ही,हे तर आहे मुक्तीधाम ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून, घेऊ जाणून देवाची लीला ।।१।। संसारातील सुखदुःखांना,घरीच सोडून या । भक्ती निरपेक्ष असावी,हे तुम्ही जाणून घ्या ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,कर्म देईल फळ तुम्हाला ।।२।। कर्तव्य पूर्ती होता,तुम्ही घेतली समाधी । कर्म हाच धर्म आहे,भक्ती नाही आहे ही साधी ।। ज्ञानोबा सांगतील ओवीतून,भिऊ नका तुम्ही मरणाला ।।३।। सुहास सदाशिव सांबरे दि.१४/७/२००५

आपला तो बाब्या,दुसऱ्याचं ते कार्ट

 आहे जगाची रीत जुनी,ज्याला त्याला वाटतं । आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।।धृ ।। पक्ष सोडूनि जाणारा दलबदलू तो हरामखोर पक्षात कुणी येता नवा,मतपरिवर्तन ते असते थोर संधी साधू हे राजकारण ज्याला त्याला कळतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं   ।। १  ।। मुलीच्या लग्नात बापाला आठवे हुंडाविरोधी कायदा मुलाच्या लग्नात मात्र पाहावा लागतो होणारा फायदा खायचे अन दाखवायचे वेगळेच असतात दात आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं  ।।२।। कोणी खाता पैसे म्हणशी अगदीच नाही त्याला लाज स्वतः मात्र संधी साधून म्हणतो त्याला माझा नाईलाज आपल्या अंगावर आलेलं ढकलायचं असतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।।३।। मुलगी सासरी जाता वाटे तिच्या सासूने करावे काम पण इकडे सुनेने काम करूनी  द्यावा सासूला आराम असं उलट सुलट सुलट उलट यांचं डोकं तरी कसं चालतं  आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं ।। ४।। दि. ५ जून २००७

प्रभू श्रीराम कसे दिसत होते - संत तुलसीदास

 श्रीरामाचं वर्णन करताना संत तुलसीदास यांची प्रतिभा एका वेगळ्याच उंचीवर जाते. ठुमक चलत रामचंद्र हे गीत लिहिताना राम कुणासारखा दिसतोय यावर बराच वेळ त्यांना उपमा सुचेना.शेवटी त्यांच्या लक्षात आलं या विश्वात श्रीराम यांच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही आणि मग त्यांनी लिहिलं तुलसीदास अति आनंद देखी के मुखा रविंद रघुवर छबी के समान रघुवर छबी के समान रघुवर छबी बनिया याचा अर्थ श्रीराम हे इतर कुणासारखे देखणे नसून ते श्रीरामा सारखेच देखणे आहेत. लेखक - सुहास सांबरे हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लतादीदींच्या दैवी आवाजात तुलसीदास यांची ही अजरामर रचना https://youtu.be/IGaQSumuSpA

चहाचा पाढा

 चहा एके चहा,चहा दुणे साखर कमी जाते भाकर,या चहाने हो   चहा एके चहा,चहा त्रिक खारी चव लई न्यारी,या चहाची हो चहा एक चहा,चहा चोक बशी उठून बसला आळशी, एक चहाने हो चहा एक चहा, चहा पंचे टोस्ट जमा झाले दोस्त,या चहाचे हो चहा एके चहा,चहा सके कप दुनिया बसते गप,या चहाने हो चहा एके चहा,चहा सत्ते पत्ती गायब झाली सुस्ती,या चहाने हो चहा एके चहा,चहा आठ्ठे कटिंग सुरू करा मिटिंग,या चहाने हो चहा एके चहा,चहा नव्वे गाळण मिटून गेले भांडण,एका चहाने हो चहा एके चहा,चहा दहा दूध पृथ्वीवर अमृत,आहे चहा हो रचना - सुहास सांबरे दि.15.12.2021

आईची आठवण

 तुझी  आठवण जातच नाही आई मनातून माझ्या | किती तरी गोड त्या स्मृति, तुझ्या संगती, सदा राहतील ताज्या || घर भरलेले, मन भरलेले, आनंदाने गजबजलेले,  तू होतीस जेव्हा आई । आनंदाचे, अन दुःखाचे , सगळच बोलत होतो  तु होतीस जेव्हा आई । आता कुणाशीच नाही बोलणे, सारी कोंडले मी,हृदयात माझ्या ||  ते घर आता, उरले केवळ ,चार भिंती छपराचे असणे  ते गावही आता, वाटे परके, जिथे नाही तुझे बोलणे चालणे । जिथे त्रस्त मनाला, मिळेल विसावा ,अशी उरलीच नाही  या जगी कुठलीच जागा|| सुहास सदाशिव सांबरे 30.09.2020

आधीच हौस,त्यात पडला पाऊस

             माझा तसा नशीब  वगैरे गोष्टींवर विश्वास नाही पण आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब किंवा योगायोग म्हणून काही असतं की काय असं वाटू लागतं.माझ्या नशिबात सहलीला , फिरायला जाण्याचा योग नाही असं वाटावं अशा घटना घडत गेल्या त्या सगळ्या सांगतो. ' केल्याने देशाटन.... मनुजा चातुर्य येतसे फार ' असं खूप पूर्वी कवी मोरोपंत म्हणून गेले आहेत.यावरून तुमच्या लक्षात येईलच की मी फारसा कुठे फिरलेलो नाही म्हणजे मी चतुर,स्मार्ट वगैरे नाही,बरेच लोक मला सहजपणे फसवतात,पण ते जाऊ द्या,मूळ विषयावर येतो.तर याची सुरुवात आमच्या मराठी शाळेपासून झाली,1ली ते 7 वि मी झरेकाठी या गावात मराठी शाळेत शिकलो,पण संपुर्ण 7 वर्षात तिथे अगदी जवळ कुठेतरी का होईना पण सहल निघालीच नाही.मग तिथे पुढील वर्ग नसल्याने मी आश्वि च्या हायस्कूलला 8 वीला प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी आमच्या झरेकाठीच्या शाळेची 5 वि ते 7 वीच्या मुलांची 3 दिवसांची सहल किल्ले पाहण्यासाठी निघाली.      इकडे हायस्कूलला पण तीच तऱ्हा,मी 10 वि पास होईपर्यंत तीन वर्षात काहीतरी कारणाने एकही सहल निघाली नाही...

कविता - मला माणूस पाहिजे

                || मला माणूस पाहिजे ।                           एक होते मंदिर,उंच डोंगरावर                        कीर्ती त्याची दूरदूर,गर्दी होतसे भरपूर    ।।धृ ।। एके दिवशी देवळाचा पुजारी गेला देवाघरी कोण असेल लायक दुसरा उभा राहण्या गाभारी साधू एक होता तेथे महान,केली त्याने घोषणा उद्या परीक्षा होईल कोण पात्र त्या भूषणा   १ भल्या पहाटे ब्राह्मण चढू लागले डोंगर तो अवघड किती कष्टाचा तो रस्ता किती काटे धोंडे दगड परीक्षेत साधूने विचारले वेगवेगळे प्रश्न तरी निवडावे कुणाला साधुलाच पडला प्रश्न  २ एक तरुण गरीब ब्राह्मण अगदी शेवटी आला वेळेची किंमत का नाही,उशीर केवढा झाला म्हणे हात जोडोनि तो त्यात चूक माझी नाही चढताना भक्तजनांचे हाल बघवले नाही  ३ आलो सारे दगड धोंडे साफसूफ करून क्षमा करा आता परततो देवदर्शन घेऊन साधू विचारी प्रेमाने जाणतोस का वेद मंत्र म्हणे मी अडाणी ठाऊक ना पूजेचेही तंत्र  ४ हास्यकल्ल...